14.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मुंबई उपनगर जिल्हा आढावा बैठक संपन्न; विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

14.10.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन मुंबई येथे मुंबई उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योग, आदिवासी समाज, अल्पसंख्यांक, दिव्यांग, तसेच इतर समाज घटनांसोबत बैठक भेट घेऊन त्यांचेकडून जिल्ह्याच्या तसेच समाज घटकांच्या समाजाच्या समस्या समजून घेतल्या. सुरुवातीला मुंबई उपनगर जिल्हा तसेच बृहन्मुंबई महापालिका प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी राज्यपाल राम नाईक, माजी मंत्री सुभाष देसाई, खा. अनिल देसाई, आ. अनिल परब, आ. पराग शाह, माजी खासदार गोपाल शेट्टी, विद्या चव्हाण, रुबीन मस्कारेन्हस, प्रकाश रेड्डी यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन व मुंबई महानगरपालिकेतर्फे केलेल्या सादरीकरणाचे वेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत दहिया, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांसह मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.