14.09.2024:राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतले गणरायांचे दर्शन

14.09.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईतील मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा, मुंबई सेंट्रल येथील हमाल मंडळाचा गणपती तसेच गिरगावच्या केशवजी नाईक चाळ येथील मुंबईतील पहिल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या गणपतीस भेट देऊन राज्यपालांनी दर्शन घेतले. हमाल मंडळाच्या गणपतीची आरती करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी तेथील गणेश भक्तांशी संवाद साधला. केशवजी नाईक चाळ येथील गणेशोत्सवाची परंपरा त्यांनी जाणून घेतली.