13.12.2020 : ‘गुरु ग्रंथ साहिब मधील संत नामदेव’ पुस्तकाच्या आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
13.12.2020 : सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत नामदेव अध्यासन आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव यांच्या 750 व्या जयंती वर्षात देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.