13.09.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रम संपन्न
13.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महापर्व – २०२३’ कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्संग श्रवण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मिशनचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेश जी यांनी पर्युषण निमित्त प्रवचन केले. गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते राज्यपालांना झारखंड येथील पवित्र जैन तीर्थस्थळ श्री सम्मेत शिखरजी पर्यटन स्थळ होण्यापासून वाचविल्याबद्दल ‘जैन धर्म हितेशी’ उपाधी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘डिलिंग विथ एंगर इफेक्टिव्हली’ व ‘रिलीजींग एंगर मेडिटेशन’ या क्रोध नियंत्रण या विषयावरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.