12.10.2023 : राज्यपालांनी दिली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला भेट
12.10.2023 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचे कुलगुरु व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व वृक्षारोपण केले. यावेळी कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी राज्यपालांना विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीला आमदार तथा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विद्यापीठाचे कुलसचिव भटू प्रसाद पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकम, अनिल कुलकर्णी, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. राम ठाकर आदी उपस्थित होते.