12.09.2024: राज्यपालांनी अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज दिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ केला
12.09.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज अंध व्यक्तींच्या अखिल भारतीय ध्वज दिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राजभवन मुंबई येथे करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद सचिव गोपी मयूर, खजिनदार विनोद जाजू, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, आदी उपस्थित होते.