12.01.2025: राज्यपालांनी सैन्य दलातील अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलनाला रवाना केले
12.01.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनसीपीए मुंबई येथून सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलनाला झेंडी दाखवून रवाना केले. त्यानंतर, ‘परेड ऑफ व्हेटरन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संचलनात स्वतः सहभागी होऊन राज्यपालांनी सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या ‘वंदे मातरम’ च्या जयघोषात त्यांनी माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचालनासोबत चालून माजी सैनिकांप्रती आपली सद्भावना प्रकट केली. परेड ऑफ व्हेटरन्स’चे आयोजन नेव्ही फाउंडेशनच्या मुंबई शाखेतर्फे नेव्हीच्या पश्चिम विभाग मुख्यालयाच्या सहकार्याने केले होते. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जसजीत सिंह, नेव्ही फाउंडेशन मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.