12.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ पुरस्कार सोहळा संपन्न

12.01.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुणे येथे ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ पुरस्कार निवडक सायबर योद्धे विद्यार्थी व शिक्षण संस्थांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन क्विक हिल फाउंडेशनतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, क्विक हिल टेकनॉलॉजीजचे अध्यक्ष डॉ कैलाश काटकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यपीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर , सहव्यवस्थापक डॉ संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी तसेच विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व राज्याच्या विविध भागातील सायबर योद्धे उपस्थित होते.