11.02.2024 : उपराष्ट्रपतींच्या हस्ते गोंदिया येथे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंत व्यक्तींचा सत्कार
11.02.2024 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज गोंदिया येथे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. डॉ श्रीमती सुदेश धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी गोंदियातील नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (NFTI) च्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.