10.06.2023 : राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ व मराठवाडा येथील पारंपरिक व कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक
10.06.2023 : राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर येथे विदर्भ व मराठवाडा येथील पारंपरिक व कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक संपन्न झाली. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित होते. कुलगुरुंच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला तसेच वार्षिक शैक्षणिक कॅलेंडरची समयबद्ध अंमलबजावणी व परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व पदुम विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता उपस्थित होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्यव्यवसाय विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे कुलगुरु उपस्थित होते.