09.11.2023 : दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

09.11.2023 : दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.