09.10.2024: राज्यपालांची बीड जिल्हयामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
09.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी बीड येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृह येथे आगमनानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासनातर्फे राज्यपालांसमोर एक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, शिक्षण, व्यवसाय, माध्यम व उद्योग यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी देखील राज्यपालांची भेट घेऊन जिल्ह्याच्या समस्यांविषयी चर्चा केली. आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, माजी आ. सय्यद सलीम सय्यद अली, एड. उषा दराडे राजेंद्र मस्के, उद्योजक मनु दुगड, अशोक शेटे, राजीव संचेती, डॉ. सुधीर निकम, डॉ. संजय पाटील आदींनी राज्यपालांची भेट घेतली.