09.09.2024: राज्यपालांनी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी साधला संवाद

09.09.2024: राज्यपाल सी. पी. धाकृष्णन यांनी नाशिक मधील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.