08.03.2023: राज्यपालांच्या हस्ते आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांच्या सत्कार
08.03.2023: प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेच्या अंतर्गत पाचवा ‘जन औषधि दिवस’ तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय ‘जन चेतना अभियानाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘जन औषधी ज्योती’, ‘जन औषधी सर्वश्रेष्ठ’ व ‘जन औषधी मित्र’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचारी व आशा सेविकांच्या सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते सोलापूर जिल्यातील गुणे जन औषधी केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले. यावेळी केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव 2 नवीन सोना तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे