07.12.2024 : राजापालांची चेंबूर येथील ‘शंकरालयम’ मंदिराला भेट

07.12.2024 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी प्रति शबरीमला म्हणून ओळखले जात असलेल्या चेंबूर मुंबई येथील ‘शंकरालयम’ मंदिराला भेट देऊन भगवान अय्यप्पा, शिव व कामाक्षी देवीचे दर्शन घेतले. हरिहरपुत्र भजन समाजाद्वारे संचालित मंदिर स्थापनेचे ५८ वे वर्ष साजरे करीत आहे. यावेळी राज्यपालांनी टी एस वैद्यनाथन, पी एस सुब्रमण्यम, आर. रामस्वामी, सी ए वैद्यनाथन आणि अयप्पा दास यांना सनातन धर्माच्या सेवेबद्दल ‘धर्मसेवा रत्न’ पुरस्कार प्रदान केला. कार्यक्रमाला जयंत लापसिया, अध्यक्ष, श्री हरिहरपुत्र भजन समाज, के एन सुरेश, अध्यात्मिक प्रमुख, एस परमशिवन, व्यवस्थापकीय विश्वस्त आणि हितेंद्र मोटा, जैन सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.