07.09.2023 : जन्माष्टमी निमित्त राज्यपालांची राधा गोपीनाथ मंदिराला भेट

07.09.2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सहकुटुंब इस्कॉनच्या गिरगाव चौपाटी येथील राधा गोपीनाथ मंदिराला भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल व श्रीमती रामबाई बैस यांनी भगवान राधा गोपीनाथांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या मूर्तीचे देखील राज्यपालांनी यावेळी दर्शन घेतले व उपस्थितांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मंदिराचे विश्वस्त गौरांग प्रभू यांनी राज्यपालांचे स्वागत केले व मंदिराची माहिती दिली.