07.01.2024: “परेड ऑफ व्हेटरन्स”ला राज्यपालांनी झेंडा दाखवून रवाना केले.
07.01.2024: शौर्य पदकांनी विभूषित सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी व जवानांच्या तिसऱ्या वार्षिक संचलनाला “परेड ऑफ व्हेटरन्स” राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी एनसीपीए मुंबई येथून झेंडा दाखवून रवाना केले. राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. ‘परेड ऑफ व्हेटरन्स’चे आयोजन नेव्ही फाउंडेशनच्या मुंबई शाखेने पश्चिम नेव्ही विभागाच्या सहकार्याने करण्यात आले. या परेडमध्ये 90 वर्षांचे कॅप्टन राज मोहिंद्रा तसेच नाईक दीपचंद यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय सिंह, नेव्ही फाउंडेशन मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.