04.09.2024: राष्ट्रपतींनी उदगीर, जिल्हा लातूर येथे ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला
04.09.2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उदगीर, जिल्हा लातूर येथे ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनांच्या लाभार्थींशी संवाद तसेच लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.