04.02.2025: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

04.02.2025: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. सशक्त राष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्ये सशक्त होणे आवश्यक आहे असे सांगून संसदीय सहकार्य राज्यस्तरावर देखील वाढावे या दृष्टीने ही भेट असल्याचे रशियन संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी संसद अध्यक्ष वोलोदिन यांनी राज्यपाल राधाकृष्णन तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.