03.06.2026: पद्मश्री मुरलीकांत पेटकर व ज्येष्ठ पत्रकार व संपादिका प्रीती सोमपुरा यांनी त्यांची पुस्तके राज्यपालांना भेट दिले
03.06.2026: भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते व सैन्य दलातील सेवानिवृत्त हवलदार पद्मश्री मुरलीकांत पेटकर तसेच ज्येष्ठ पत्रकार व संपादिका प्रीती सोमपुरा यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी राज्यपालांना उज्ज्वला बर्वे लिखित त्यांच्या जीवन कार्यावर आधारित “योध्दा चँपियन मुरलीकांत पेटकर” तसेच त्याचा अनुवाद असलेले “The Murlikant Petkar Story: Defying the Bullet” ही पुस्तके भेट दिली. खेळाडू, मॅरेथॉन धावपटू आणि न्यूज १८ ग्रुपच्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांनी राज्यपालांना स्वलिखित ‘बचापोश’ आणि ‘चुलबुली जोया’ ही दोन पुस्तके भेट दिली आहेत.