01.10.2024: राज्यपालांची गडचिरोली येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा
आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उद्योजक, समाजसेवक, गणमान्य नागरिक व पत्रकारांशी जिल्ह्यातील विविध विकास विषयक प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यपालांपुढे जिल्ह्याचे सादरीकरण केले तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांचेसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ देवराव होळी, माजी खासदार अशोक नेते, देवाजी तोफा, पद्मश्री डॉ परशुराम खुणे, डॉ आनंद बंग, लॉइड्स मेटल कंपनीचे संचालक बी प्रभाकरन, स्पर्श संस्थेचे डॉ दिलीप बारसागडे, आदींनी आज राज्यपालांची भेट घेतली.