01.10.2021 :राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या प्रसिद्ध रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन साजरा
01.10.2021 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या प्रसिद्ध रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन साजरा झाला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेच्या प्रोसेस इनोवेशन सेंटर व स्नातक विद्यार्थी प्रयोगशाळेचे तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाला संस्थेचे कुलपती रघुनाथ माशेलकर, माजी कुलगुरु प्रा. जे. बी. जोशी आणि माजी कुलगुरु जे. डी. यादव ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, कुलसचिव प्रा. राजेंद्र देशमुख, विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख व प्राध्यापक राज्यपालांसमवेत उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. सुरज सोमण यांना अल्कील अमिन्स आयसीटी स्थापना दिवस युवा वैज्ञानिक पुरस्कार दूरस्थ माध्यमातून प्रदान करण्यात आला.