01.08.2024: राज्यपालांनी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/K4CE04FGFR0/mqdefault.jpg)
01.08.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली. यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते डॉ. राहुल बोधी हे यावेळी उपस्थित होते.