01.07.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जीएसटी चा ६ व्या वर्धापन दिन साजरा
01.07.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्तु सेवा कर (जीएसटी) ६ वा वर्धापन दिन यशंवतराव चव्हाण सेंटर, नरिमन पाँईट, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी केंद्रीय वस्तु सेवा कर (जीएसटी), मुंबई क्षेत्राचे प्रधान मुख्य आयुक्त, पी के अग्रवाल, केंद्रीय वस्तु सेवा कर (जीएसटी), मुंबई क्षेत्राचे मुख्य आयुक्त हे मंचावर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते जीएसटी च्या काही निवडक अधिकाऱ्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.