01.05.2026 : राज्यपालांचे भाषण : महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त
01.05.2026 : महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा तथा त्यांच्या पत्नी श्रीमती सुधा देव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत हा राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अमरवाणी फाउंडेशन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शांतनू हेरळेकर, उपग्ना पंड्या आणि अभिमन्यू हेरळेकर यांनी मराठी व गुजराती लोकगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पद्मभूषण उदय कोटक, पद्मश्री अशोक खाडे, कलाकार पद्मश्री भिकल्या ढिंडा, पद्मश्री जुजर वासी, अभिनेते आर. माधवन तसेच सत्यनारायण नुवाल यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच डॉ. मदन महाराज गोसावी, उद्योजक निखिल मर्चंट, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपाल गृहव्यवस्थेचे नियंत्रक डॉ. निशिकांत देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.