01.05.2024: राज्यपालांनी महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण करुन संचलन पथकाकडूनमानवंदना स्वीकारली
01.05.2024: महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व नागरिकांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत तसेच अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.