मा. राज्यपालांचे भाषण :- 09.05.2023: युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची महाराष्ट्र राज्यपालांशी भेट
09.05.2023: मा. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आयोजित ‘युवा संगम’ उपक्रमा अंतर्गत पंजाब राज्यातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या ४५ युवक-युवतींनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी युवकांनी महाराष्ट्रातील आपले अनुभव सांगितले तसेच राजभवनाला भेट दिली. यावेळी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभासिस चौधरी, ‘युवा संगम’चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाचा भाग म्हणून युवकांच्या विविध राज्यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तसेच दादरा नगर हवेली येथील ४५ युवक देखील पुढील आठवड्यात पंजाब भेटीवर जाणार आहेत.