भाषण – 21.08.2024: अंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन
22.08.2024 : अंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांनी युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार केला. राज्यपालांच्या हस्ते ‘३७ कोटी स्टार्ट अप्सचा देश’ आणि ‘मंदिर अर्थशास्त्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंच (एसजेएम)चे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्की, रा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवी, आंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते. उद्योजकता प्रोत्साहन संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन, मुंबई व स्वदेशी जागरण मंच, कोकण यांच्या वतीने करण्यात आले.