जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कारांचे वितरण

12.03.2020: प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील निवडक जिल्हा परिषदा व पंचायत समितींना तसेच अधिकाऱ्यांना यशवंत पंचायत राज अभियान योजनेअंतर्गत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. . ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ, राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंद कुमार, कोकण उपायुक्त सुप्रभा अग्रवाल, गिरीष भालेराव यांच्यासह विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.