बंद

    29.01.2022 : राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित

    राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ४४ डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. ‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षण संस्थाचालक लल्लन तिवारी, ‘परिश्रम’ संस्थेचे निमंत्रक ऍड. अखिलेश चौबे, डॉ राजकुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.