बंद

    Remarks by Governor at the Mass Marriage Ceremony

    प्रकाशित तारीख: April 16, 2016

    Remarks by Shri CH Vidyasagar Rao, Governor of Maharashtra at the Mass Marriage Ceremony under the “Shiv Sena Pramukh Shriman Balasaheb Thackeray Kanyadan Yojana” at the Ayodhya Nagari Maidan, Railway Station Road, Aurangabad at 1245 hrs on Saturday 16 April 2016

    Shri Uddhav Thackeray, Hon’ble Executive President of Shiv Sena, Shri Aditya Thackeray, Shri Anant Gite, Hon’ble Minister for Heavy Industries, Government of India, Shri Ramdas Kadam, Hon’ble Minister for Environment, Shri Diwakar Raote, Hon’ble Minister for Transport, Shri Trimbak Tupe, Mayor of Aurangabad, Shri Chandrakant Khaire, Hon’ble Member of Parliament and the chief organizer, Shri Rajkumar Dhoot, Hon’ble Member of Rajya Sabha, all Hon’ble MLAs, people’s representatives, invitees, all bridges and bridegrooms getting married today,

    नमस्कार आणि शुभ मंगल सावधान.

    शिव सेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत सामूहिक विवाह सोहोळयासाठी येथे येऊन खूप आनंद वाटला.

    आज येथे जमलेल्या सर्व नव-वधू आणि वरांचे मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना शुभ आशीर्वाद देतो.

    माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शना-खाली श्री चंद्रकात खैरे जी यांनी हा सामूहिक विवाह समारंभ आयोजित केला, त्या बद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो॰

    सामूहिक विवाह हा चांगला उपक्रम आहे. त्यातून पैशाची बचत होते. आज मराठवाडा येथे पाण्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सामूहिक विवाहामुळे पाण्याची देखील बचत होणार आहे.

    आज विविध धर्माची व जातींची जोडपी येथे विवाहबद्ध होत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यातून सर्व धर्म समभाव व सामाजिक एकोपा वाढेल, असे मला वाटते.

    काही समाजात आजही हुंडा घेण्याची वाईट प्रथा आहे. ही प्रथा बंद होण्याच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे.

    महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे. सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आपण देशापुढे एक आदर्श ठेवला आहे.

    हा उपक्रम सर्व गावांमध्ये तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये राबवावा असे मी आवाहन करीत आहे.

    पुन्हा एकदा, मी आयोजकांना शुभेच्छा देतो.

    सर्व नवीन जोडप्यांनी सुखाने संसार करावा, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

    शुभ मंगल सावधान. नांदा सौख्यभरे.

    जय हिंद जय महाराष्ट्र