30.07.2024: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून राज्यपाल बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना
30.07.2024: आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांना राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असलेले पुस्तक भेट दिले. निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल बैस यांनी त्यानंतर रायपुरकडे प्रस्थान केले.
30.07.2024: Outgoing Governor of Maharashtra Ramesh Bais was given a warm farewell by the Chief Miinister, Deputy Chief Ministers and senior Government officials at Raj Bhavan Mumbai. Chief Minister Eknath Shinde accompanied by Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar felicitated the Governor and his wife Rambai Bais by offering shawl, bouquet and mementos. The Governor thanked all for extending him the best cooperation during his tenure in Maharashtra. Guardian Minister Deepak Kesarkar, Chief Secretary Sujata Saunik, DGP Rashmi Shukla, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar, ACS Protocol Manisha Mhaiskar were among those present on the occasion. After the farewell function, the Governor was given a ceremonial Guard of Honour by the Indian Navy. The Governor accepted the salute after which he departed for Raipur.