30.06.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३ विषयावरील चर्चासत्राचा समारोप
30.06.2024: केंद्र शासनाच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे नव्याने पारित झालेल्या 'फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३' या विषयावरील चर्चासत्राचा समारोप राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. समारोप सत्राला छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश सिन्हा, गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सुनीता अगरवाल, जम्मू आणि काश्मीर व लद्दाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन कोटीस्वर सिंह, डॉ रिटा वशिष्ठ, सदस्य सचिव, केंद्रीय विधी आयोग, विधी कार्य विभागाचे सचिव डॉ राजीव मणी, विभागाच्या अतिरिक्त सचिव डॉ. अंजू राठी राणा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अधीनस्थ न्यायालयांचे न्यायाधीश, अधिवक्ता, शिक्षणतज्ज्ञ, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच विधी शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
30.06.2024: Maharashtra Governor Ramesh Bais presided over a Conference on Latest Criminal Law Reforms 2023 on the theme 'India's Progressive Path in the Administration of Criminal Justice System' in Mumbai. The Conference was organised by the Department of Legal Affairs, Ministry of Law & Justice, Government of India. Chief Justice of the Chhattisgarh High Court Justice Ramesh Sinha, Chief Justice of the Gujarat High Court Justice Sunita Agarwal, Chief Justice of the Jammu & Kashmir and Ladakh High Court Justice N Kotiswar Singh, Member Secretary of Law Commission of India Dr Reeta Vasishtha, Secretary of the Department of Legal Affairs Dr Rajiv Mani, Addl Secretary Anju Rathi Rana, Judges of the Bombay High Court, judges of subordinate courts, pleaders, educationists, representatives of Law Enforcement agencies and Law students were present.