29.09.2024 : पंतप्रधानांच्या दूरस्थ उपस्थितीत पुणे येथील विविध विकास योजनांचे व सोलापूर विमानतळाचे उदघाटन
29.09.2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुणे येथील विविध विकास योजनांचे तसेच सोलापूर विमानतळाचे उदघाटन केले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन या कार्यक्रमाला दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पुणे मेट्रो फेज १ अंतर्गत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचा शुभारंभ केला तसेच सोलापूर विमानतळाच्या सुविधांचे उदघाटन करण्यात आले. तसेच स्वारगेट - कात्रज मेट्रो लाईन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाडा येथील पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची कोनशिला बसवण्यात आली व बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण करण्यात आले.