29.03.2023 : राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ पार पडला. दीक्षांत समारोहाला आयआयटी कानपूरचे माजी संचालक प्रा. संजय धांडे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आदी उपस्थित होते.