29.02.2024: राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
29.02.2024: राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ आज (दि. २९) विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांनी यावेळी दीक्षांत भाषण केले. यावेळी दीक्षांत रोमारोहात १९७१६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर ११८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व २०५ स्नातकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या. कुलगुरु प्रो. विजय माहेश्वरी, प्रकुलगुरु सोपान इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ विनोद पाटील तसेच विविध अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.
29.02.2024: Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 32nd Annual Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon (KBCNMU) through online mode on Thu (29 Feb). Secretary General of Association of Indian Universities (AIU) Dr (Mrs) Pankaj Mittal delivered the Convocation address. Vice Chancellor Prof. Vijay Maheshwari, Pro Vice Chancellor Prof. Sopan Ingle, Director of Board of Examinations and Evaluation, Registrar Dr. Vinod P. Patil, Members of various boards of authorities, Deans, faculty and graduating students were present. Degrees were presented to 19716 graduating students while 118 students were awarded Gold Medals. In all 205 graduating students were awarded Ph.Ds.