28.03.2025: आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या वतीने राजभवन येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
28.03.2025: आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पूर्वीची इंडियन मर्चंट चेंबर)च्या वतीने राजभवन मुंबई येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज संपन्न झाले. राज्यपालांच्या हस्ते तसेच प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीत एका कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच राजभवन मियावाकी जंगल प्रकल्प या विषयावरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मियावाकी जंगल प्रकल्पाअंतर्गत राजभवनातील हिरवळीनजीक पश्चिम समुद्र किनाऱ्यावर ६००० चौरस फूट जागेवर ४८ प्रकारांच्या २००० रोपांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांनी आयएमसीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच झाडांची लागवड व बागकाम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. या समारंभाला आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष सुनिता रामनाथकर, इंडियन मर्चंट्स चेंबरच्या शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधी, आयएमसीचे माजी अध्यक्ष आशिष वैद, नीरज बजाज, शैलेश वैद्य आणि अनंत सिंघानिया, आयएमसी लेडीज विंगच्या उपाध्यक्षा राजलक्ष्मी राव आदी उपस्थित होते.
28.03.2025: Governor C P Radhakrishnan today inaugurated the Miyawaki styled Forest created by IMC Chamber of Commerce at Raj Bhavan, Mumbai. The Governor released an information book on the Miyawaki Forest project and unveiled a plaque on the occasion. Under the project, 2000 saplings of 48 varieties have been planted on the western sea front of Raj Bhavan on a plot measuring 6000 sq ft. Vice President of the IMC Chamber of Commerce and Industry Sunita Ramnathkar, Past Presidents of the Chamber Ram Gandhi, Niraj Bajaj, Ashish Vaid, Shailesh Vaidya and Anant Singhania, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware, Vice President of IMC Ladies Wing Rajyalakshmi Rao and others were present.