27.12.2021: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न
27.12.2021 : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समांरभ राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गोवा येथील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनिल कुमार सिंह, कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी आणि कुलसचिव सुधीर पुराणिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकुण २,१२,५७९ स्नातकांना पदव्या , २४३ स्नातकांना पी एचडी प्रदान करण्यात आली.
27.12.2021: Governor and Chancellor of State Universities Bhagat Singh Koshyrari presided over the Annual Convocation of the 164- year old University of Mumbai at the Sir Cowasji Jehangir Convocation Hall of the University in Mumbai. Minister of Tourism and Protocol Aaditya Thackeray, Director of National Institute of Oceanography Prof. Sunil Kumar Singh, Vice Chancellor Dr. Suhas Pednekar, Pro Vice Chancellor Prof. Ravindra Kulkarni, Registrar Dr Sudhir Puranik, Director, Board of Examination and Evaluation Dr Vinod Patil, Members of various boards of authorities, Deans, faculty and graduating students were present.