27.02.2023 : राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
27.02.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज राज्याच्या २०२३ वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान मंडळ येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.