26.11.2024: राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
26.11.2024: पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील हुतात्म्यांना अभिवादन केले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.
26.11.2024: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan placed a wreath at the Police Martyrs’ Memorial in the premises of the Mumbai Police Commissionerate on the occasion of the 16th anniversary of the martyrdom of police officers and jawans during the Mumbai terrorist attack. Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Ministers Devendra Fadnavis and Ajit Pawar also placed wreaths at the Police Martyrs’ Memorial. Soon after the salutation ceremony, the Governor met the family members of the police martyrs and senior retired and serving officers present on the occasion. Guardian Ministers Deepak Kesarkar and Mangal Prabhat Lodha, Chief Secretary Sujata Saunik, DGP Rashmi Shukla, Dr I S Chahal, Police Commissioner Vivek Phansalkar and others were present.