25.08.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘राजभवनचा समुद्र किनारा’ या माहितीपटाचे सादरीकरण संपन्न
26.08.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'राजभवनचा समुद्र किनारा' या माहितीपटाचे सादरीकरण संपन्न
26.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत 'राजभवनचा समुद्र किनारा' या माहितीपटाचे प्रदर्शन राजभवन येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.यावेळी जॅकी श्रॉफ यांनी आपल्या लहानपणीच्या राजभवनाच्या आठवणींना उजाळा दिला. या माहितीपटातून राजभवनाचा तसेच येथील समुद्र किनाऱ्याचा इतिहास कथा व मुलाखात रुपाने सांगण्यात आला असून जॅकी श्रॉफ, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर तसेच राजभवनातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी त्यात आपल्या आठवणी सांगितल्या आहेत.