25.02.2025 : राज्यपालांनी पुणे येथील सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचा घेतला आढावा
25.02.2025 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुणे येथील सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनिल गंगाधर भिरुद यांनी यावेळी विद्यापीठासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठात अत्याधुनिक तसेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करणे, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांचे उच्च तंत्र शिक्षणातील प्रमाण वाढवणे, जगातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत सहकार्य वाढवणे, अखिल भारतीय स्तरावर विद्यापीठाची क्रमवारी सुधारणे, विद्यापीठातील मुला मुलींसाठी वसतिगृहाच्या सुविधा वाढविणे, शैक्षणिक वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.