24.02.2025 : राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २४ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न झाला. दीक्षांत समारंभात १५ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १३९ सुवर्णपदके तसेच ८५४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे प्रति कुलपती व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ बी एन गंगाधर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले जन डॉ माधुरी कानिटकर (नि.), प्रकुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता व स्नातक उपस्थित होते.