23.07.204: राज्यपालांची पालघर जिल्ह्यातील इस्कॉन संस्थेच्या ‘गोवर्धन इको व्हिलेज’ परिसराला भेट
23.07.2024: राज्यपाल रमेश बैस यांनी आज पालघर जिल्ह्यातील गल्तरे येथील इस्कॉन संस्थेच्या 'गोवर्धन इको व्हिलेज' परिसराला भेट दिली. यावेळी गोवर्धन इको व्हिलेजच्या मदतीने पालघर जिल्ह्यात शाश्वत शेती, कौशल्य प्रशिक्षण, आदिवासी शिक्षण व आरोग्य तसेच जलसंधारण यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गोवर्धन इको व्हिलेजचे संस्थापक राधानाथ स्वामी, गोवर्धन इको व्हिलेजच्या कृषी व ग्राम विकास प्रकल्पाचे संचालक सनत कुमार दास, स्ट्रॅटेजी व कोलॅबोरेशन संचालक गौरांग दास, गोवर्धन कौशल्य केंद्राच्या संचालिका मैथिली देसाई व सामाजिक प्रकल्प सल्लागार रमा सिंह उपस्थित होते.
23.07.204: Maharashtra Governor Ramesh Bais visited the Govardhan Eco Village project of ISKCON at Galtare in Palghar district. The Governor felicitated the 'Change Icons' working in the areas of healthcare, education, skill development, improvement of Ashram Shalas and Water Conservation. Founder of the Govardhan Eco Village project Radhanath Swamy, Director of Agriculture and Rural Development of Govardhan Eco Village Sanat Kumar Das, Director of Strategy and Collaborations Guranga Das, Director of Govardhan Skills Centre Maithili Desai and Advisor of Social Impact projects Rama Singh were prominent among those present.