20.03.2025: राज्यपालांनी ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (‘वकील आपल्या दारी’) या उपक्रमाचा शुभारंभ केला
20.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गरीब आणि गरजू लोकांना तसेच कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी सुरु केलेल्या 'लीगल एड ऑन व्हील्स' ('वकील आपल्या दारी') या उपक्रमाचा राजभवन, मुंबई येथे शुभारंभ केला. 'दर्द से हमदर्द ट्रस्ट'च्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांनी 'वकील आपल्या दारी' या उपक्रमासाठी सुरु केलेल्या विशेष वाहनाची पाहणी केली व सेवाभावाने विनामूल्य कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकीलांशी संवाद साधला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी, 'दर्द से हमदर्द तक ट्रस्ट'चे अध्यक्ष अॅड. प्रकाश जे. सालसिंगीकर, सुनिता खंडाळे, रवींद्र लोखंडे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.
20.03.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan today launched the initiative 'Legal Aid on Wheels' that aims to provide legal aid to the poor and vulnerable sections of society and undertrials at Raj Bhavan, Mumbai. The Governor inspected the legal assistance vehicle and interacted with the volunteers and lawyers associated with the Trust. The 'Legal Aid on Wheels' is an initiative of the 'Dard Se Humdard Trust'. Social worker Ravindra Sanghvi, founder of the 'Dard Se Humdard Trust' Adv Prakash Salsingikar, Sunita Khandale and Ravindra Lokhande were present.