19.06.2025: रा. स्व. संघाचे प्रचारक रमेश पतंगे लिखित ‘व्हाय आर वी इन द आरएसएस?…’ या इंग्रजी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
19.06.2025: लेखक, विचारवंत व रा. स्व. संघाचे प्रचारक रमेश पतंगे लिखित 'व्हाय आर वी इन द आरएसएस?...' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला रमेश पतंगे, 'आम्ही संघात का आहोत?...' या पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ अश्विन रांजणीकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व इतर निमंत्रित उपस्थित होते. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'साप्ताहिक विवेक'तर्फे प्रकाशित या पुस्तकाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.
19.06.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan released the book ‘Why Are We in the RSS...?’ written by author, ideologue and RSS pracharak Ramesh Patange at Raj Bhavan, Mumbai. Dr Ashwin Ranjaniker, translator of Patange’s original Marathi book ‘Aamhi Sanghat Ka Aahot?...’, Secretary to the Governor Dr Prashant Narnaware and invitees were present. Saptahik Vivek has published the book on the occasion of the centenary year of the Rashtriya Swayamsevak Sangh. The book has a foreword by RSS Sarsanghchalak Dr Mohan Bhagwat.