18.09.2021: राज्यपालांच्या हस्ते किन्हवली येथे नव्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन
18.09.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे विद्या प्रसारक मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्या प्रसारक मंडळाच्या नव्या विस्तारित इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद (आप्पा) भानुशाली, आमदार दौलत दरोडा व इतर निमंत्रीत उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कोकणचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.
18.09.2021: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the new Law College of Vidya Prasarak Mandal at village Kinhavali in Shahapur taluka of Thane district. The Governor also inaugurated the post graduation courses started by the Vidya Prasarak Mandal and laid the foundation stone of the new College Extension building on the occasion. Union Minister of State for the Panchayati Raj Kapil Patil, Maharashtra's Minister of Higher and Technical Education Uday Samant, Chairman of Vidya Prasarak Mandal and senior journalist Arvind (Aappa) Bhanushali, MLA Daulat Daroda and invitees were present on the occasion. The Governor felicitated Kapil Patil, Konkan DIG Sanjay Mohite and Thane Collector Rajesh Narvekar on the occasion.