17.07.2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सहकार्याने राबवावयाच्या प्रकल्पासंदर्भात एका सामंजस्य करारावर राज्यपालांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या
17.07.2024: राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये कॉम्पुटरायझेशन प्रकल्प राबविण्याकरिता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सहकार्याने राबवावयाच्या प्रकल्पासंदर्भात एका सामंजस्य करारावर राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सीड्रोम एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय वासेकर यांचेसोबत सामंजस्य कराराचे हस्तांतरण केले, तसेच प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश दिला. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून या प्रकल्पासाठी ३.५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून त्यातून एकलव्य मॉडेल विद्यालयांना १००० कॉम्पुटर्स व शिक्षकांसाठी ७६ टॅब्स देण्यात येणार आहे. यावेळी प्राधिकरणाच्या महाव्यवस्थापक (प्रशासन) आणि सचिव मनीषा जाधव, आदिवासी विकास मंत्रालयातील उपसचिव डॉ. राजी एन.एस., मुख्य कार्यपालन अधिकारी नितीन एम. बोरवणकर, जी. वैद्यनाथन, कॅप्टन बाळासाहेब पवार, गिरीश थॉमस, तसेच प्राधिकरणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
17.07.2024: A Memorandum of Understanding was signed in presence of Maharashtra Governor Ramesh Bais for the computerization of Eklavya Model Residential Schools in the State at Raj Bhavan Mumbai. Under the project, JNPA will fund the purchase of 1000 computers and 76 Tabs for 38 Eklavya Schools in the State. The MoU was inked by the Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) and the CDROME Education Society for the implementation of JNPA's CSR project. Chairman of JNPA Unmesh Wagh exchanged the MoU with President of CDROME Education Society Vijay Vaasekar. General Manager of JNPA Manisha Jadhav, Deputy Secretary in Ministry of Tribal Affairs Dr Raaji N S and officers of JNPA and CDROME Education Society were present.