17.07.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटन
17.07.2023: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अध्यक्षतेखाली आज इंडियन रेडक्रॉस सोसायटी (IRCS) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटन सत्र पार पडले. यावेळी विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल व नायब राज्यपाल, रेड क्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया तसेच रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने 2021-22 या वर्षासाठी निधी संकलन, रक्त संकलन आणि सदस्य सहभागिता या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ओडिशा व हरियाणा राज्यांना तसेच जम्मू - काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले. रेड क्रॉस सोसायटीच्या गुजरात राज्य व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाला देखील रक्तदान चषक देण्यात आले. रेड क्रॉस सोसायटीच्या दोन स्वयंसेवकांना उत्कृष्ट वैयक्तिक योगदानासाठी रेड क्रॉस गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.
17.07.2023: President of India Droupadi Murmu presided over the Ceremonial Session of the Annual General Meeting of the Indian Red Cross Society (IRCS) from Rashtrapati Bhavan. Governors and Lt. Governors of various States and Union Territories, Union Minister of Public Health and Family Welfare Dr Mansukh Mandaviya and office bearers of Indian Red Cross Society were present. Maharashtra Governor Ramesh Bais participated in the Ceremonial Session through online mode. The States of Odisha and Haryana were given the awards for best work in Fund Raising and Memberships of IRCS, while the same for Union Territories was given to Jammu and Kashmir. The State of Gujarat and the Union Territory of Dadra Nagar Haveli were given the Shields for best performance in Blood Donation. Two Red Cross volunteers were also felicitated.