17.07.2023 : राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी
17.07.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापटनम या युद्धनौकेला तसेच आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली. नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला व आयएनएस विशाखापटनमचे कमान अधिकारी कॅप्टन अशोक राव यांनी राज्यपालांचे स्वागत केले व त्यांना युद्धनौकेची माहिती दिली. आयएनएस वेलाचे कमोडोर श्रीराम अमूर व कमान अधिकारी मिथिलेश उपाध्याय यांनी राज्यपालांना आयएनएस वेला पाणबुडीची माहिती दिली.